Saturday , 18 November 2017
Home / Cities / Mumbai / ​स्कूल बस पॅटर्न राज्यात राबवा

​स्कूल बस पॅटर्न राज्यात राबवा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शालेय विद्यार्थी वाहतुकीची स्थिती चिंताजनक असून, राज्यात तीन लाख स्कूल बसची आवश्यकता असताना रस्त्यावर केवळ ३० हजारच आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी नाशिकच्या आरटीओ अधिकाऱ्यांच्या सहकार्याने वाहतूक सेनेने ९०० परवानाधारक स्कूल बसेस तयार केल्या आहेत. हा राज्यातला पहिला उपक्रम असून, वाहतूक सेनेच्या माध्यमातून असे उपक्रम राज्यभर राबविले जायला हवेत, असे आवाहन करताना परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी नाशिक वाहतूक सेनेचे कौतुक केले. मुलांच्या सुरक्षिततेसाठी अशा पद्धतीच्या उपक्रमांची गरज असून, यासाठी जलद परवाने उपलब्ध करून देणे स्तुत्य आहे, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या विद्यार्थी वाहतूक बस शाखेने दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित केलेल्या मेळाव्यात स्कूल बस वाटप परवाने वाटप कार्यक्रमात परिवहन मंत्री रावते बोलत होते.

रावते म्हणाले,‘विद्यार्थ्यांची वाहतूक परवडली पाहिजे. त्यासाठी रिक्षांनाही विद्यार्थी वाहतुकीसाठी परवाने देण्याचा विचार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार स्कूल बसचे नियम केले आहेत. त्यासाठी काटेकोर अंमलबजावणीचे काम आमचे खाते करत आहे. विद्यार्थी वहातुकीसाठी रिक्षावर बंदी घालण्यात आली होती मात्र ‌स्कूलबस आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याच्या पालकांच्या तक्रारीनंतर छोट्या वाहनांनाही वाहतूक परवाने देण्याचे गरज समोर आली. यासाठी वाहतूक सेनेच्या माध्यमातून हा उपक्रम हाती घेण्यात आला. याला आता यश आल्याचे दिसत आहे.’

आरटीओमध्ये एक हजार अधिकारी भरण्याचा प्रस्ताव गेले दहा वर्ष मंत्रालयात फिरतो आहे. पण त्यातील एक अट किचकट होती आता ती काढून टाकल्यामुळे हे अधिकारी आम्ही भरणार आहोत. यामुळे परिवहन विभाग अधिक सक्षमपणे काम करताना दिसेल, असेही ते म्हणाले.

यावेळी वाहतूक सेनेचे अध्यक्ष अजीज सैय्यद व देवानंद बिरारी यावेळी सत्कार करण्यात आला. या मेळाव्यास शिवसेनेचे उपनेते बबनराव घोलप, असिफ शेख, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते व महाराष्ट्र वाहतूक सेनेचे प्रदेशाध्यक्ष उदय दळवी, आमदार योगेश घोलप उपस्थित होते.

Let’s block ads! (Why?)


Source link

Check Also

Probe BJP minister's Rs 5 crore 'offer' to Shiv Sena MLA: Sanjay Raut

A day after a Shiv Sena MLA claimed that a senior BJP minister in Maharashtra …

Leave a Reply